विवाह नोंदणी कशी करावी|विवाह नोंदणी कागदपत्रे|मॅरेज सर्टिफिकेट बनविण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

मॅरेज सर्टिफिकेट बनविण्याकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती. आपल्याला विवाह नोंदणी कार्यालय मध्ये जाऊन आपण विवाह नोंदणी करणं गरजेचं असतं हे विवाह नोंदणी प्रमाणपत्र आपल्याला अत्यंत आवश्यक असतं त्यामुळे आपलं लग्न झाले हा विवाह नोंदणीचा पुरवा आपल्याकडे प्रमाणपत्राचा राहतो.त्यामुळे आपण विवाह नोंदणी कार्यालय मध्ये जाऊन आपल्याला आवश्यक असणारे कागदपत्रांची पूर्तता आहे तिथे पूर्तता करून आपण विवाह नोंदणी कार्यालय मध्ये जाऊन आपली विवाह नोंदणी करणे गरजेचे आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे त्यासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्रांची आणि विविध कागदपत्रांची आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे कागदपत्रे घेऊन विवाह नोंदणी कार्यालयात जा. विवाह नोंदणी कार्यालये खालीलप्रमाणे असतातगाव – ग्रामपंचायत कार्यालयतालुका – सेतू किंवा तहसील कार्यालयजिल्हा – स्वतंत्र विवाह नोंदणी कार्यालयमॅरेज सर्टिफिकेट बनविण्याकरिता आवश्यक कागदपत्रे कोणती.

मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे (marriage certificate document list in marathi)

आवश्‍यक कागदपत्रे

1)वधू व वर यांचा रहिवासी पुरावा- (उदा. रेशन कार्ड, दूरध्वनी बिल, वीज बिल, पासपोर्ट यांच्या मूळप्रतीसह सत्यप्रती).

2)वधू आणि वर यांच्या वयाचा दाखला- (उदा. शाळा, सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यांच्या मूळप्रतीसह सत्यप्रती).

3)लग्नविधी प्रसंगीचा फोटो,

4)लग्नाची पत्रिका, लग्नाची पत्रिका नसल्यास ॲफिडेव्हिट द्यावे लागते.

5)पुरोहित स्वाक्षरी आवश्यक -लग्नाचा ब्राह्मण सोबतचा एक फोटो. तसेच विवाह नोंदणी अर्जावर लग्न लावलेल्या पुरोहिताची स्वाक्षरी आवश्‍यक असते.

6) साक्षीदार पुरावे -तीन साक्षीदारांचे रहिवासी पुरावे (उदा. रेशनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र यांच्या मूळप्रतीसह सत्यप्रती).

7) वधू वर घटस्फोटीत असल्यासवर आणि वधू घटस्फोटित असल्यास कोर्टाच्या हुकूमनाम्याची सत्यप्रत.

8) वधू वर विधवा विधुर असल्यास -वर-वधू , विधुर-विधवा असल्यास संबंधित मृत व्यक्तीच्या मृत्यूचा मूळ दाखला सत्यप्रतीसह.

10)100 रु कोर्ट फी स्टॅम्पवरील सर्व कागदपत्रे घेऊन नोंदणी कार्यालयात जाऊ शकतात.

विवाह नोंदणी कार्यालय कुठे आहेत.

विवाह नोंदणी कोठे करतात ? (Marriage registration in maharashtra)तुमचा विवाह कुठे झाला आहे शहर,ग्रामीण भागात, मंदिरात अश्या विविध ठिकाणी झाला असेल तर तुम्हाला विविध ठिकाणची नोंदणी करावी लागेल.

1)ग्रामिण भागात विवाह झाला असेल तर ग्रामपंचायत मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहेत.

2) शहरात विवाह झाला असेल तर सरकारी दवाखान्यातून तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट घ्यावे लागते ,किंवा त्या शहरातील नगर पालिका किंवा महानगर पालिका येथे तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र भेटेल.

3) लग्न मंदिरात झाले असेल तर ट्रस्ट कडून तुम्हाला विवाह नोंदणी किंवा मॅरेज सर्टिफिकेट मिळेल.

1)गाव – ग्रामपंचायत कार्यालय

2)तालुका – सेतू किंवा तहसील कार्यालय.

3)जिल्हा – स्वतंत्र विवाह नोंदणी कार्यालय

विवाह दाखला किती दिवसात मिळतो.

विवाह कायद्यानुसार 15 दिवस ते 60 दिवस लागू शकतात.विवाह नोंदणीसाठी पैसे द्यावे लागतात का ? ( Marriage certificate fee)तुम्ही जर विवाह नोंदणी लग्न झाल्यावर

2 महिन्याच्या आत मध्ये केली तर तुम्हाला कोणतीही फी द्यावी लागणार नाही. तुम्ही जर सहा महिन्याच्या पुढील वेळात नोंदणी साठी अर्ज दाखल केला तर तुम्हाला आवश्यक ती फी जमा करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top