मराठी म्हणी, म्हणी व त्यांचे अर्थ.

मराठी म्हणी

 • पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविण
 • मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
 • बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे
 • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
 • आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
 • उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा
 • अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
 • नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
 • तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे
 • नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही
 • अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा
 • छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे
 • तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
 • दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर
 • नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
 • एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो
 • पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
 • वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
 • रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी
 • अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते
 • शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
 • नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती
 • नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे
 • आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण
 • कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे
 • आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
 • काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे
 • झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
 • पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे
 • मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये
 • उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे
 • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही
 • कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
 • गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
 • घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे
 • डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे
 • भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे
 • वरातीमागून घोडे – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे
 • पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?
 • खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
 • तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे
 • नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी
 • हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
 • कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे
 • गर्जेल तो पडेल काय? – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही
 • टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्टाशिवाय यश मिळत नाही
 • वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे
 • कुंपणानेच शेत खाणे – रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे
 • दगडावरची रेघ- कायमची गोष्ट

चढेल तो पडेल——उत्कर्षासाठी धडपडणाऱ्या माणसाला अपयश आले तरी त्यात कमीपणा नाही

चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही——काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाहीत

चांभाराच्या देवाला खेटराची पूजा——जशास तसे या न्यायाने वागणे चांगले

चार आण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला——क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च

चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे——प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी आयुष्यात मिळतेच

चालत्या गाडीला खीळ घालणे——व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचणी निर्माण करणे

चिंती परा ते ये‌ई घरा——दुसर्‍याचे वाईट चिंतीत राहिले की ते आपल्यावरच उलटते

चोर तो चोर वर शिरजोर——गुन्हा करुन वर मुजोरी

चोर सोडून संन्याशाला फाशी——खरा गुन्हेगार न पकडता आणि त्याला शिक्षा न देता निरपराध माणसाला शिक्षा होणे

चोराच्या उलट्या बोंबा——स्वतःच गुन्हा करुन दुसर्‍याच्या नावाने ओरडणे

चोराच्या मनात चांदणे——वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटणे

चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक——वाईट माणसांनाच वाईट माणसाची लक्षणे कळतात

चोराच्या हातची लंगोटी——ज्यांच्याकडून काही मिळायची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे मिळणे हेच नशीब

चोराला सुटका आणि गावाला फटका——चोर सोडून निरपराधी माणसाला पकडणे

चोरावर मोर——एकापेक्षा एक सवाई

चोरीचा मामला हळू हळू बोंबला——पापकर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायचे असते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top