घर नावावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे|Home documents list in Marathi

घर नावावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे घर हे प्रत्येकाला आवश्यक असे निवारा स्थान आहेत. आपल्याला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला मिळणं खुप महत्त्व देणारं आहे. घर खरेदी करणे ते नावावर करणे असे खुप महत्वाचे बाबी आहेत. घर खरेदी कर करण्यापासून घर नावावर होईपर्यंत खुप डोकमेंट्स ची गरज असते. त्यामध्ये आणेवारी चतुरसीमा खरेदीखत असे सर्व कागदपत्रे आवश्यक असतात. घर नावावर करायचे असतील तर आधी कोणाच्या नावावर आहेत. कोणाच्या नावावर घराची नोंदणी आहे ते पाहणे गरजेचं आहे. त्यांची कागदपत्रे सर्व बरोबर आहेत कां ते पाहिलं पाहिजेल.

घर नावावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे|Home documents list in Marathi

घर नावावर करताना कोणती माहिती असणे आवश्यक आहे.

घर नावावर करताना आवश्यक ती सर्व माहिती कागदपत्रे तपासून पाहणे गरजेचे आहेत. 7/12 उतारा आणेवारी समंती पत्र असे सर्व कागदपत्रे तपासणे गरजेचं आहेत. त्याच बरोबर तुम्हाला घर नावावर करायचे असेल तर ते घर आधी कुणाच्या नावावर आहे.ते घर वारसा हक्काने आलेले आहे की, खरेदी केलेलं आहे. कां कोणी दान स्वरूपात दिले गेले आहे. अशी सर्व माहिती तपशील सहित तपासून घेणे खुप महत्वाचे आहेत.

1) कोणी घर दान केले असेल तर दान स्वरूपातील घर आहे कां हे पण पाहणे अतिशय महत्वाचे आहे.

2)तुम्ही, जे घर खरेदी करताय ते घर कोणाच्या नावावर आहे हे पण तुम्ही पाहणे खुप महत्वाचे आहेत.

3)तुम्ही,जे खरेदी केलेलं घर नावावर करताना ते खरेदी खत केलेलं आहे हे पाहणं खुप गरजेचे आहेत.

4) तुम्ही, घर पाहताना नावावर करता असताना ते घर वारसा हक्काने मिळालेलं आहेत कां हे ही पाहणे खुप गरजेचं आहे.

घर नावावर करताना आवश्यक कागदपत्रे,अर्जा सोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

1) विहित नमुना अर्ज

2) तुम्ही जे घर घेतं आहात तेथील जागा खरेदी खत

3)आणेवारी

4)चतुरसिमा

5) स्टॅप

घर नावावर करताना आवश्यक घराची जमिनीची काही महत्वाची कागदपत्रे

1)घराची लांबी रुंदी

2)घर कोणत्या बाजूला आहे ती घराची दिशा

3)मिळकत वर्णन माहिती

1) कच्च घर

2)सिमेंट घर

3)RCC बांधकाम

4)दगड विटा

5)मातीचे घर

6)विटा वाळु

7)लोंखडी सिमेंट पत्राचे घर

8)घराचा व्हरांडा

9) शौचालय

घर नावावर करताना काही मूलभूत माहिती मिळविणे गरजेचे आहे.

मालमत्ता नावावर नावावर अनेक प्रकारे होऊ शकते.

1)तुम्ही, मालमत्ता नावावर करायच्या विचारात असताल तर तुम्ही रीतसर पैसे दिले गेले पाहिजेत त्याच बरोबर तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरून रीतसर खरेदी करावी.

2) तुम्ही, तुमच्या वडिलांची जागा किंवा घर नावावर करतं असताल तर वारस हक्काने तुम्हांला ते मिळू शकते.

3) तुम्हांला वडिलांचे घर वारस हक्काने नावावर करायचे असेल तर तुम्हांला तुम्ही एकमेव वारस आहात यांची प्रथम सिद्धता करावी लागेल.

4) वारस हक्काने घर नावावर करताय तर तुम्ही तुमचे इतर वारस असतील तर त्यांचे समंतीपत्र किंवा हक्कसोड पत्र असणे सादर करणे गरजेचं आहे.

5)घर नावावर करताना, तुम्हांला वारस असतील तर सर्व वारस मध्ये घर विभागले जाते.

6) कोणाला मालमत्ता स्वखुशीने द्यायची असेल तर देऊ शकतात स्वखुशिने दान बक्षीसपत्र होतं असते.

नवीन घराची नोंद कशी लावावी.

तुम्ही तुमचे नवीन घर बांधले आहे, त्याची तुम्हाला नोंदणी करायची असेल घराची नोंद लावायची असेल तर तुम्ही कोठे घर बांधले आहे त्या भागातील ग्रामपंचायत, नगरपालिका हद्द असेल तर तिथे जाऊन तुम्ही घराची नोंद लावून घेऊ शकतात सोबत तुम्ही घराची नोंद लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करू शकतात सात बारा उतारा,8 अ, अशी आवश्यक कागदपत्रे तुम्ही देऊ शकतात.घर नावावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

घर नोंद लावताना आवश्यक माहिती

1) जवळच्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद या ठिकाणी जाऊन घराची नोंद करू शकतात.

2) घराची नोंद करताना स्वतःच्या नावावर करायची असल्यास स्वतःचा 7/12 उतारा,8 अ इत्यादी माहिती कागद पत्रे सोबत घेऊन जाणे गरजेचं आहे.

3)घर वडिलांच्या नावावर असेल तर तुम्ही समंती पत्र घेऊन सही सकट मालक हक्क तुमच्याकडे तुम्ही घेऊ शकतात.

4)तुम्ही तुमच्या घराची लांबी रुंदी यांची माहिती अर्ज सहित सादर करावी.वरील प्रमाणे घर नावावर करण्यासाठी आवश्यक माहिती आपण पाहिलेली आहे.

घर नावावर करताना आवश्यक कोणकोणती माहिती असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर आवश्यक घराबाबत माहिती घराचं स्वरूप माहिती असणे गरजेचं आहे. घराची दिशा घर कुठे बांधले आहेत त्या जागेची माहिती अशी सर्व माहिती आपण पाहिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top